| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील कामत आळीमधील 123 वर्षापूर्वीच्या जुन्या श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय विद्यमान विश्वस्तांनी ठरविले आहे. मंदिर आराखड्यास अलिबाग नगरपरिषद व सहायक नगर रचना कार्यालयीन अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. नियोजित बांधकाम एक मजल्याचे असून त्याची फी पण भरली आह. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे तरी ज्या गणपती भक्तांना या कामासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी चेक श्री गणपती देव नावाने क्रॉस करून दानपेटीत टाकावा चेक च्या मागे संपूर्ण नाव मोबाईल नंबर व पत्ता लिहा म्हणजे त्याची पावती त्यांना देता येईल,असे आवाहन विश्वस्त गणेश चिंतामण कामत, सुगंधा गणेश कामत यांनी केले आहे.