| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कुडली ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार व सभागृहाचा उद्घाटन कार्यक्रम माजी आ. धैर्यशील पाटील व शेकाप नेते पंडित पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शेकाप तालुका चिटणीस राजेश सानप, उपसरपंच उत्तम कामथेकर, जितेंद्र जोशी, मारुती खांडेकर, अनिल तवटे, बाळा धनावडे, लक्ष्मण धनावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभागृहाच्या बांधकामासाठी माजी आ. धैर्यशील पाटील व खा. सुनिल तटकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. मुंबई, सूरत या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्य असणार्या ग्रामस्थांनीदेखील मंदिराच्या उभारणीत मोठे योगदान दिले. यामुळेच या देखण्या मंदिराची उभारणी शक्य झाली असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.