सर्व क्षेत्रावरील निर्बंध; संपूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी खुले

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची माहिती
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळेनुसार खुले करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे.
ही वस्तुस्थिती विचारात घेता, साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती निवारण कायदा, 2005 नुसार महाराष्ट्र शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी खुले करण्याकरिता निर्देश पारित केलेले आहेत, असे पुढे जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
राज्य शासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. देशातील व शेजारच्या राज्यांतील कोविड 19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये निरंतर व सातत्याने घट होत आहे.
आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड 19 विषयक निर्बंधाचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त बाळगल्यामुळे हे सर्व यश प्राप्त झाले आहे.

Exit mobile version