• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

गुगलला लगाम

Varsha Mehata by Varsha Mehata
January 29, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भांडवलशाहीमध्ये शोषण होतं हा सामान्य सिध्दान्त झाला. पण तिथे फक्त आणि फक्त शोषणच होतं असं घडत नाही. काही ठराविक कंपन्यांची, मालकांची मक्तेदारी तयार होते. तेच अधिकाधिक श्रीमंत होतात हे खरं आहे. जसं की भारतात पूर्वीपासून टाटा, बिर्ला किंवा अलिकडे अंबानी, अदानी यांची संपत्ती फुगत चालली आहे. मात्र या व्यवस्थेत त्यांच्यावर बंधनेही घातली जातात. न्यायालये किंवा काही वेळेला सरकारी यंत्रणा त्यांना जाब विचारते. या कंपन्या बलिष्ठ होऊ नयेत म्हणून संसद कायदे करते. कारण, शेवटी या कंपन्या सरकारवरच हुकुमत गाजवू लागतील अशी भीती राजकीय पक्षांना असते. अमेरिका आणि युरोपला भांडवलशाहीची मक्का म्हटलं जातं. पण तिथेही बड्या कंपन्या फार डोक्यावर बसू नयेत असे प्रयत्न चालू असतात. त्यातून सरकार आणि या कंपन्यांमध्ये संघर्ष घडतो. वीस वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट अशी कंपनी होती. सध्या गुगल, अमेझॉन त्यापैकी आहेत. या कंपन्यांना तेथील सरकारांनी अनेकदा दंड केला आहे. आपल्या देशातील स्पर्धा नियामक आयोगाने गेल्या आठवड्यात गुगलला चाप लावला. त्यानुसार आता नवीन मोबाईल फोनमध्ये गुगलनिर्मित अ‍ॅप्स सक्तीचे करता येणार नाहीत आणि ग्राहकाला वाटले तर तो हे अ‍ॅप्स फोनमधून काढूनही टाकू शकेल. सध्या तसे करता येत नाही. हे जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा आपल्याला गुगलने किती गुलाम करून ठेवले आहे हे सर्वांना कळेल. मोबाईल फोन इत्यादी साधनांचे साधारणपणे दोन वर्ग करता येतात. यात आयफोन, आयपॅड इत्यादी अ‍ॅपल वापरणार्‍यांचा एक वर्ग आहे. तो सोडून दुसरा जो वर्ग आहे त्यातील बहुतांश मोबाईल फोन्स अँड्रॉॅईड या वापरव्यवस्थेवर किंवा ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. या अँड्रॉईडची मालकी गुगलकडे आहे. आयफोनमधील वापरव्यवस्था ही केवळ त्याच कंपनीच्या फोनमध्ये चालते. त्यांची अ‍ॅप्सही स्वतंत्र आहेत. गुगलने तसे केले नाही. त्यांनी जगभरातील सर्व मोबाईल उत्पादक कंपन्यांना अँड्रॉईड पुरवले. किंबहुना असे करूनच त्याने आयफोनला शह दिला. मात्र हे करताना गुगलने एक अट टाकली. ती अशी की, कोणत्याही नवीन मोबाईलमध्ये गुगलचे क्रोम हे सर्च इंजिन, जीमेल, प्लेस्टोर आणि गुगल मॅप्स इत्यादी त्या फोनच्या अंगचाच भाग असल्याप्रमाणे त्यात टाकलेले असले पाहिजेत. त्यामुळे आज बाजारात आपण कोणताही नवीन फोन घेतला की त्यासरशी सक्तीने गुगलची ही सर्व बाळे आपल्या अंगणात दाखल होतात. आता त्यांची इतकी सवय झाली आहे की, ते आपल्याला नैसर्गिकच वाटते. प्रत्यक्षात ते तसे नाही. उदाहरणार्थ, गुगल मॅप्सऐवजी भारत सरकारने विकसित केले असलेले किंवा मॅप्सऑफइंडियासारखे अ‍ॅपही चांगले आहे. पण गुगलच्या मक्तेदारीमुळे ते आपल्यापर्यंत येत नाही. याहू किंवा रिडिफमेल किंवा अन्य फलाटांवर आपण मेल खाते उघडू शकतो हेही आपण विसरून गेलो आहोत. आता नवीन नियमामुळे ग्राहकांना तर स्वातंत्र्य मिळेलच पण नवीन अ‍ॅप्स करणार्‍या कंपन्यांनाही वाव मिळेल.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

आपण कोण आहोत?

Next Post

ईशान्य भारतात निवडणुकीची रणधुमाळी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

ईशान्य भारतात निवडणुकीची रणधुमाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?