| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन पर्यटन संस्थेचे सभासद व श्रीवर्धन पोलीस ठाणे यांच्यामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटकांकडून मद्यपान करून वाहन चालविणे, कुठेही धिंगाणा घालणे, समुद्रकिनारी मद्यपान करणे, अपघात होणे या घटनांचे प्रमाण श्रीवर्धनमध्ये वाढले आहे. याबाबत पर्यटन संस्थेच्या सभासदांनी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी उपस्थित पर्यटन संस्थेच्या सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा खासगी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये देखील पर्यटक धिंगाणा घालत असतील, ऐकत नसतील तर 112 क्रमांका वरती कळवा. त्या ठिकाणी पोलीस तातडीने हजर होतील असे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सांगितले. श्रीवर्धन शहरात येणाऱ्या रस्त्यावर शुक्रवार, शनिवार, नाकाबंदी देखील सुरू करण्यात आलेली आहे. कोणीही पर्यटक जरी गैरवर्तन करताना दिसून आले तरी कोणीही कायदा हातात घेऊ नका. 112 क्रमांकावर संपर्क साधा, अथवा श्रीवर्धन पोलीस ठाण्याजवळ संपर्क साधण्यास सांगितेल. बैठकीला पर्यटन व्यावसायिक असलेले देवेंद्र भुसाणे, संतोष केळसकर, विवेक बंदरकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
श्रीवर्धनमध्ये पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप
