नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. ल देशात 4 महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा 40 हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळली आहे. देशात 47 टक्के रुग्णवाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 654 नवीन करोना रुग्ण आढळले. तर 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर, गेल्या 24 तासात 41 हजार 678 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात 3 लाख 99 हजार 436 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 06 लाख 63 हजार 147 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर 4 लाख 22 हजार 022 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.