प्रवीता माने यांचा सेवानिवृत्त समारंभ

स्वखर्चाने उभा केला विद्यालयाचा नामफलक
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धनच्या र.ना.राऊत विद्यालयात मी 23 वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केली, ते विद्यालय माझे कर्मभुमी आहे. माझ्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी माझे दैवत आहेत. माझी कर्मभुमी असलेल्या शाळेबद्दल एक कृतज्ञता म्हणून मी शाळेसाठी रविंद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालय हा मेटल धातुचा फलक देत आहे. शहरात वास्तव्यास असणारे या शाळेचे माजी विद्यार्थी श्रीवर्धनमध्ये येतील तेव्हा हा फलक बघून त्यांनाही अभिमान वाटेल असे भावुक उद्गार शुक्रवारी (दि.31) सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभावेळी प्रवीता मिलिंद माने काढले.


श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळ, श्रीवर्धन या संस्थेचा हरिहरेश्‍वर, गालसुरे, वालवट व श्रीवर्धन येथे सेवेत असणार्‍या विद्यार्थ्यांच्या लाडक्या माने मॅडम यांनी राज्यस्तरीय खो-खो असोसिएशन उपाध्यक्षा राहिल्या आहेत. सांस्कृतिक क्षेत्र, महिला दक्षता समिती, पर्यटन विकास मंडळ अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटावणार्‍या माने यांच्याबद्दल अध्यक्ष अनिल भुसाणे यांनी कौतुक करतांना सांगितले की, शाळेसाठी चांगला नामफलक हवा, तो मी स्वखर्चाने करणार आहे असे सुचित केले होते. त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे मेटल धातूपासून तयार केलेल्या नामफलकाचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद होतं आहे. यावेळी कार्यवाह योगेश गंद्रे, सह कार्यवाह संदीप भगत प्राचार्य रविंद्र ढाकणे, चंद्रकांत हुंदिलकर, विष्णू पवार, काशीनाथ चुनेकर, मोहन वाघे, उमेश आमले, दत्तात्रेय कोसबे, सदानंद केळस्कर, गणेश मांजरेकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version