गणेश तेलंगे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम

। म्हसळा । वार्ताहर ।

चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार (दि.31) मे रोजी सेवानिवृत्त झालेले म्हसळा तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळाच्या सभागृहात संपन्न झाला.

यावेळी तहसीलदार घारे यांनी सांगितले कि, तेलंगे 2022 ला नायब तहसीलदार म्हणून हजर झाले. परंतु, त्यादिवसांपासून त्यांनी कुठल्याही जबाबदारीला न घाबरता पत्येक जबाबदारी त्यांनी हसतमुखपणे पेलली. अत्यंत गरीब परिस्थिती असतांनाही त्यांनी तलाठी ते नायब तहसीलदार पदापर्यंत त्यांची झेप हि निश्‍चितपणे अभिमानास्पद असून त्यांचा हा आदर्श नवीन पिढीला घेण्यासारखा असल्याचेही सांगितले. तेलंगे यांचे उर्वरित जीवन हे सुखी, समाधानी राहो आणि त्यांना दीर्घाआयुष्य आणि आयुरारोग्य लाभो अश्या शुभेच्छा तहसीलदार घारे यांनी दिल्या. तहसीलदार समीर घारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमांस स्कूल कमिटी अध्यक्ष समीर बनकर, निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले, डॉ. खान, नगरसेविका राखी करंबे, संतोष जाधव, गणेश तेलंगे त्यांचे कुटुंब, सचिन धोंडगे, सर्व तलाठी, महसूल कर्मचारी, अजय जाधव, गोरखनाथ माने, कोतवाल आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version