ड्रेसिंग रुममध्ये मास्कचे पुनरागमन

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएलच्या 15 व्या हंगामाला कोरोनाचे गालबोट लागले असून दिल्लीच्या ताफ्यातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतरही दिल्ली आणि पंजाबच्या दरम्यान सामना खेळवला गेला होता आणि त्या सामन्यात दिल्लीचा मोठा विजय झाला आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंवर आणि संघाच्या गोटात कोरोनाची भीती स्पष्ट दिसत होती.

दिल्लीच्या ताफ्यातील सहा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते त्यामध्ये 2 खेळाडू आणि 4 इतर सहकारी होते. सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग, प्रविण आमरे, शेन वॉटसन आणि अजित आगरकर यांच्यासोबत संघातले सर्व खेळाडू तोंडाला मास्क लावून बसले होते. त्यांच्या गोटात कोरोनाची भीती स्पष्ट दिसत होती परंतु या सामन्यात दिल्लीने चांगली कामगिरी करत विजय मिळवला आहे.

Exit mobile version