चोरीला गेलेली रक्कम मुळमालकास परत  

| माणगाव । वार्ताहर ।

माणगांवमध्ये झालेला चोरीचा गुन्हा माणगांव पोलीसांनी कांही दिवसात उघडकीस आणला असून आपल्याच नोकराने कलेक्शन करून आणलेली रक्कम चोरट्यांनी चोरी केल्याचा बनाव करून हडप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. माणगाव पोलिसांनी आपल्या चलाखीने हा चोरीचा बनाव नोकरानेच केला हे प्रथम दर्शनी लक्षात घेऊन उघडकीस आणला होता. त्याप्रमाणे तपास पूर्ण करून या गुन्ह्यात चोरीला गेलेली 5,57,299 रुपयाची रक्कम हस्तगत करून न्यायालयापुढे ठेवली. ती रक्कम न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालक खेमचंद उर्फ विजय मेहता यांच्या पत्नी ज्योती मेहता व मुलगा मनीष मेहता यांच्याकडे माणगाव पोलीस ठाण्यात ता. 17 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. त्यावेळी मूळ मालकाच्या चेहर्‍यावर हसू फुलले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश अस्वर, सहा. फौजदार श्री. कुवेसकर, श्री. मगर प्रशांत पाटील, प्रीती उमले, महिला पोलीस नायिक सौ. धनावडे, पोलीस श्री. खिरीट, श्री. डोईफोडे, विनय पाटील, श्री. शिंदे, श्री. पोंडे, श्री. मोरे, श्री. मदने आदी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  

Exit mobile version