सरोश गोठेकरच प्रामाणिकपणा; सापडलेली सोन्याची चैन केली परत

। तळा । वार्ताहर ।
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तृप्ती थोरात यांची दीड तोळा सोन्याची चेन महाविद्यालयाच्या आवारात हरवली होती. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला सरोश गोठेकर या विद्यार्थ्यांस ती चेन सापडली असता त्यांनी प्राध्यापिका तृप्ती थोरात यांना प्रामाणिकपणे परत केली. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव मंगेश देशमुख, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्रीराम कजबजे, गो.म. वेदक विद्यालयाचे चेअरमन महेंद्र कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख, तळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य धुमाळ सर, सर्व, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व तळेवासीयांनी सरोश गोठेकर यांनी कौतुक केले आहे. तर प्राध्यापिका तृप्ती थोरात यांनी सदर विद्यार्थ्यांस 1000 रुपये रोख व पेढ्यांचा बॉक्स बक्षीस देऊन आभार व्यक्त केले.

Exit mobile version