बेघरांचे पुनर्मिलन

| पनवेल | प्रतिनिधी |

हरवलेल्या व्यक्ती आणि त्याच्या घरच्यांना पुन्हा एकत्र करणे हेच उद्दिष्ट असलेल्या वांगणीतील सील आश्रमाने नऊ वर्षांपूर्वी मुंबईतील परळच्या घरातून बेपत्ता झालेली पल्लवी साळवी (34) या मतिमंद महिलेची तिच्या बहिणीसोबत पुन्हा भेट घालून दिली. पल्लवीची तिच्या घरच्यांसोबत घालून दिलेली भेट हि त्यांची 488 वे पुनर्मिलन ठरले आहे. हताश लोकांची सुटका करणे आणि त्यांना पुन्हा एकत्र करणे ह्या उद्दात हेतूने पास्टर के एम फिलिप यांनी सोशल अँड इव्हेंजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह सीलची स्थापना केली.

Exit mobile version