रेवदंडा बसस्थानक अपघातांना निमंत्रण

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवारात पडलेले मोठे खड्डे व बेशिस्तपणे केलेल्या वाहन पार्किंगमुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेवदंडा एस.टी. बस स्थानक अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे नित्याने या तिन्ही तालुक्यात येथून एस.टी.बसेस ये-जा करत असतात. तसेच, मुरूड आगारातून मुुंबई, पुणे, ठाणे, शिर्डीसह दुरवर जात असलेल्या एस.टी. बसेसना या ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे रेवदंडा एस.टी. स्थानकांत प्रवासीवर्ग व स्थानिकांची नेहमीच वर्दळ असते. परंतु, याच रेवदंडा स्थानकात पावसाळ्यात मोठंमोठे खड्डे निर्माण झाले होते. त्यात पाणी साचून तळी निर्माण झाली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हे खड्डे पुर्णपणे कोरडे पडले असून धूपेने ते खड्डे आणखी वाढत आहेत. त्यामुळे बसेमधील प्रवाशांना धक्का बसतो, तसेच खड्डे चुकविताना वाहन चालकांची सुद्धा भंबेरी उडते. त्यामुळे अपघात होण्याची निश्चित शक्यता संभवते. एसटी प्रशासन बस स्थानकातील दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासीवर्ग व स्थानिक ग्रामस्थांमधून संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Exit mobile version