रेवदंडा शेतकरी कामगार पक्ष चषक

नाखवा वॉटरस्पोर्टस् पुरस्कृत साखर संघ विजेता

| कोर्लई । वार्ताहर ।
रेवदंडा येथे चित्रलेखा पाटील पुरस्कृत रेवदंडा शेतकरी कामगार पक्ष-2023 या तीन दिवसीय टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन रेवदंडा हरेश्‍वर मैदान येथे करण्यात आले होते. या सामन्यात प्रथम 24 संघ गांव टू गांव तर आठ संघ (खुले)सहभागी झाले होते. दि. 26 मार्च रोजी नागांवचे माजी सरपंच नंदू मयेकर यांच्या हस्ते या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. दि. 26 मार्च रोजी आक्षी-साखर येथील नाखवा वॉटर स्पोर्टस पुरस्कृत साखर संघ व हाशिवरे क्रिकेट संघ यांच्यात अटि-तटी व चरशीच्या झालेल्या सामन्यात साखर संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे रोख रुपये पन्नास हजार व चषक बक्षिस पटकाविले. तर नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत हाशिवरे संघाने द्वितीय क्रमांक मिळविला तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे रेवदंडा वैष्णवी डेव्हलपर्स पुरस्कृत अथर्व स्पोटर्स-रेवदंडा व थळ येथील माऊ एलेव्हन संघाने मिळविला. यात उत्कृष्ट फलंदाज नाखव वॉटर्स स्पोर्टस-साखर संघाच्या योगेश पेणकर याला तर उत्कृष्ट गोलंदाज हाशिवरे संघाच्या रत्नाकर याला तसेच मालिकाविर साखर संघाच्या अक्षय पाटील याला देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत, राजन वाडकर, संतोष मोरे, सदाशिव उर्फ दादा मोरे, उमेश मोरे, नितिन म्हात्रे, विजय-चोलकर, दादा चौलकर सुरेश खोत, निलेश खोत, शरद वरसोलकर, सुभाष शेळके, विक्रम सुर्वे, हेमंत गुंडा, अँड रोहीत भाईर, राहूल गणपत, दुषांत झावरे,आयोजक सागर विचारे,समीर सोलकर रिझवान पटवी, संकेत जोयशी, दिलिप भोईर, इकबाल मुकादम,यासिन मुकादम, रोशन भोईर यांसह परीसरातील तमाम क्रिकट प्रेमी उपस्थित होते. यावेळी रेवदंडा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उत्कृष्ट आयोजन करण्यात आल्याबद्दल आयोजक सागर विचारे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवदंडा शेतकरी कामगार पक्ष व सहकारी मित्र यांनी विशेष परिक्षम घेतले.

Exit mobile version