खालापूरात जलजीवनची आढावा बैठक संपन्न

। खोपोली । प्रतिनिधी ।

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम लवकरात लवकर करा असे आदेश गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी संबंधित ठेकेदारांना आढावा बैठकीत दिले आहेत. तर तांत्रिक आडचणी दूर करीत मे महिण्याच्या योजना पूर्ण होतील असा विश्‍वास गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे बैठकीदरम्यान बोलताना व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत नळपुरवठा योजनेअंतर्गत एकूण 92 योजना सुरू आहेत. यामधील 20 योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत योजनासांठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होवून योजना पूर्ण होत नसल्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते, यामुळेच सदरील योजनेचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. याप्रसंगी पाणीपुरवठा विभाग उपअभियंता संतोष चव्हाण, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

खालापूरात 92 नळपाणी पुरवठा योजना सुरू आहेत. त्यामधील 20 योजना पूर्ण झाल्या असून 8 योजना आठवड्यात पूर्ण होतील. उर्वरीत योजनांना जागेचा किंवा इतर तांत्रिक अडचणी येत आहेत. अशी तक्रार लक्षात घेवून सरपंच आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक घेवून तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत येत्या दोन महिण्यात योजना पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सांगितले.

Exit mobile version