युवक काँग्रेसची आढावा बैठक

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक गुरुवारी (दि.11) पनवेल काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत नवीन मतदार नोंदणी, चलो वार्ड अभियान व माझी लाडकी बहीण योजना याबद्दल कार्यक्रम घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. या बैठकीमध्ये कळंबोली शहर अध्यक्षपदी मन जयदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, प्रदेश सचिव प्रीतेश साहू, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, अभिजित मुडक्कल, नगरसेविका मंजुळा कातकरी, नितेश पाटील, दीपांकर पाटील, मोरेश्वर पाटील, रुपेश घरत, राहुल सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version