| ठाणे | प्रतिनिधी |
इंटर स्कूल बुद्धिबळ स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीमधील 30 शाळांनी भाग नोंदवला होता. त्यामध्ये डिवाइंड पॅराडाईज हायस्कूलचे अकरा विद्यार्थी सहभाग झाले. इयत्ता पहिली ते दुसरी स्पर्धेमध्ये संविधान केदारे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच इयत्ता पाचवी ते सहावी स्पर्धेमध्ये डिवाईन पॅराडाईज हायस्कूल चिंचपाडा कल्याण शाळेचा विद्यार्थी रियाज चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवून अंतिम विजेता ठरला. तर पिया नायर हिने तिसरा क्रमांक पटकावला. इयत्ता सातवी ते आठवी स्पर्धेमध्ये समयका गोरखनाथ केदारे हिने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे सर्वश्रेय डिवाइन पॅराडाईज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश कुमार शर्मा, दत्ता पंची तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.







