| रसायनी | वार्ताहर |
कसळखंड येथील प्रगत शेतकरी कमळाकर धोंडू घरत यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भातलागवड तसेच अशोका सीड्स कंपनीचे दोन किलो भात बियाणे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक टी.एन. दोलतोडे आणि कृषी सहाय्यक मनिषा वळसे यांनी स्वत: शेतात उतरून शेतकरी कलावंती घरत, केतन घरत, कांचन घरत, भूषण घरत, राती विनोद यांच्यासोबत भातलागवड प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
दरम्यान, चारसूत्री भातलागवड केल्यास शेतात भात उत्पादन वाढणार असून, अशा लागवडीमुळे दोन्ही रोपांतील अंतर समांतर राहिल्याने हवा खेळती राहून सूर्यप्रकाश सगळ्या रोपांना मिळतो. त्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. रोपे दोन ते तीन काड्या लावल्याने त्यांना फुटवे चांगले जोरदारपणे फुटतात, असे कमळाकर घरत यांनी सांगितले.