| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भात लावणी अंतीम टप्प्यात आली आहे. दमदार पावसामुळे खार पट्ट्यात तसेच सखल भागातील शेती लावण्यात बळीराजा व्यस्त आहे. खरीप हंगामातील भात हे एकमेव पीक असल्यामुळे लावणीसाठी रोजंदारीवर महिला- पुरुष शेतात राबतांना दिसत आहेत. जून व जुलै महिन्यात 680 मिमी पाऊस पडला असून, आतापर्यंत 1505 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यात 3300 हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र असून, या क्षेत्रामध्ये शेतकरी सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू, वाडा कोलम, रत्ना, शुभांगी, कर्जत इत्यादी भाताच्या जातीची लागवड केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात 80 टक्के लावणी पुर्ण झाली आहे अशी माहिती सहायक कृषी अधिकारी मनोज कदम यांनी दिली आहे.
भात लावणी अंतिम टप्प्यात
