पनवेल येथे भात विक्री

। पनवेल । वार्ताहर ।

डॉ.बा.सा. कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत पनवेल येथे खार जमीन संशोधन केंद्र हे कार्यान्वीत आहे. या केंद्राद्वारे खार जमीनीसाठी उपयुक्त पनवेल 1 व ट्रॉग्ये कोकण खारा या भात जातीचे बियाणे विक्री चालू आहे. दोन्ही भात वाणांचा पक्वतेचा कालावधी 125 ते 130 दिवसांचा असून ते मध्यम क्षार सहनशील आहेत. तरी किनारपट्टी लगतच्या क्षारपड जमीनीमध्ये लागवडीकरीता शेतकर्‍यांनी ही बियाणे खरेदी करण्याचे आवाहन खार जमीन शास्त्रज्ञ खार जमीन संशोधन केंद्र पनवेल यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी जी. के.खोपकर कृषिसहाय्यक खार जमीन संशोधन केंद्र पनवेल यांच्याशी दुरध्वनी क्रमांक 8275270078 वर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.

Exit mobile version