विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
| म्हसळा | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यावर कौतुकाची थाप देण्यासाठी नेहमी पुढाकार घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ज्यांची म्हसळा तालुक्यांमध्ये ओळख असलेले प्रदीप दिवेकर व विठ्ठल दिवेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून शनिवारी (दि.21) जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रिचलाईन ग्रुप यांच्या माध्यमातून दक्षिण रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांप्रती रिचलाईन ग्रुपचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पीएनपी एज्युकेशन संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी काढले.
सलग तीन वर्षे हा उपक्रम प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा पाष्टी या शाळेत 65 विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याप्रसंगी लंकेश धुमाळ, सुरेश दिवेकर, आयापन दिवेकर, प्रवीण दिवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शाळा समितीचे अध्यक्ष राजाराम धुमाळ, पाष्टी गाव अध्यक्ष राजाराम दिवेकर, उपाध्यक्ष प्रकाश लाड, पुजारी वसंत कांबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी, शिक्षक प्रफुल्ल पाटील, बिलाल शिकलगार, ललित पाटील, व्ही.व्ही. सोनवणे, लेखनिक संदीप दिवेकर, शिपाई प्रशांत जोशी, दर्शना काकी यांचे सहकार्य लाभले.
ग्रामीण भागातील खेडेगावातील विद्यार्थ्यांच्या हातात जेव्हा हे शैक्षणिक साहित्य मिळाले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होतो असे सांगून रिचलाईन ग्रुपच्या विद्यमाने आयोजित या विधायक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नेहमीच शैक्षणिक प्रेरणा मिळते. या कार्यक्रमाबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी संस्थेचे आभार मानून धन्यवाद दिले.






