मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात रिक्षाला भीषण अपघात

अपघातातदोन ठार एक गंभीर जखमी
। अलिबाग । वार्ताहर ।
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात घाट उतरत असताना शींग्रोबा वरच्या खिंडीत रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघेजण ठार व एक गंभीर जखमी झाला आहेत.
मच्छिंद्र कांबळे व बालाजी विजेंद्र राव असे मृत व्यक्तींचे नावा असून गणेश चव्हाण हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमीवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला नवी मुंबईच्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच मृत व्यक्तींचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात ठेवले आहे. तीव्र उतारावर चालकाचे कंट्रोल गेल्यामुळे रिक्षा बाजूच्या डोंगराला आपटली व पलटी होऊन अपघात झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या घटनेचा तपास खोपोली पोलीस आणि बोरघाट पोलीस यंत्रणा करत आहेत.

Exit mobile version