रिक्षाची ट्रकला भीषण धडक; एकाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

रिक्षा आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात रिक्षा चालक मोरेश्‍वर अनंता सोनावळे रा. ठोंबरेवाडी, पोयंजे यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी ट्रकवरील चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालक याने वाहनातील डिझेल संपल्याने ट्रक रस्त्यावर उभा केला होता. यावेळी पार्किंग लाईट दिली नव्हती. यावेळी रिक्षावरील चालक मोरेश्‍वर सोनावळे यांनी थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आजीवली ब्रिज, जुना पुणे बंगळूर हायवे, पुणे लेनवर, कोनगाव येथे झाला. त्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version