विद्यार्थिनीचा विनयभंग; रिक्षाचालकाला अटक

। मुंबई । प्रतिनिधी ।

गोरेगाव येथे शिकवणीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणार्‍या रिक्षाचालकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी सोमवारी (दि. 20) रिक्षाने शिकवणीला जात होती. त्यावेळी 32 वर्षीय आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीकडे तिचा मोबाइल क्रमांक मागितला. तिने नकार दिल्यानंतर रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यांनी याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी आरोपीला राहत्या परिसरातून अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version