चिमुकलीवर रिक्षा चालकाचा बलात्कार

पुणे | वृत्तसंस्था |
रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकाच्या फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेतील आरोपी रिक्षाचालकाचे नाव सागर मांढरे (39) आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेला आठ दिवस होत नाही, तोच ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.

Exit mobile version