| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानाशेजारी एका रिक्षा चालकाला दोघा अज्ञात इसमांनी जबर मारहाण करून लुटल्याने शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानाबाहेरील झाडाखाली रिक्षा चालक पंकज गजानन म्हात्रे (22) हे रिक्षा थांबवून मैदानाच्या पूर्वेकडील बाजूला रिक्षातच विश्रांती घेत असताना स्कुटीवरून आलेल्या दोघांनी एका अल्पवयीन मुलास मारझोड केली. रिक्षाच्या मागच्या बाजूला कुणाला तरी मारहाण होत असल्याचे लक्षात येताच पंकज रिक्षातून उतरून त्या दोघांना जाब विचारू लागल्याने हल्लेखोरांनी त्या मुलाला सोडून पंकज म्हात्रे यांच्यावरच प्राणघातक हल्ला चढविला. पिसाळलेल्या त्या दोघा हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी पंकज म्हात्रे यांना मारहाण केली. त्यांचे डोके, गळ्यावर आणि पाठीवर जखम होईपर्यंत त्यांना मारले. त्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर ठेवलेला मोबाईल जबरदस्तीने त्यांनी पळवून नेला. याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
रिक्षाचालकाला अज्ञातांनी लुटले

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606