रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, पैशाची बॅग केली परत

। रसायनी । वार्ताहर ।
चांभार्ली येथील कौतुभ जगताप यांचा दूध व्यवसाय असून, ते चांभार्लीहून आपल्या स्कुटीवरुन बॅकेत पैसै भरणा करण्यासाठी रस्त्याने जात असताना नकळत स्कुटी वरून बॅग खाली पडली. ते यावेळी सेबी वळणावर एचडिएफसी बँकेसमोर आल्यानंतर आपली पैशाने भरलेली एक्कावन्न हजार रुपये रोख असलेली बॅग हरविल्याचे जगताप यांच्या लक्षात आले.
याचवेळी सदर बॅगकडे रिक्षाचालकाचे लक्ष गेल्याने त्याने रिक्षा बाजूला करून पाहिले असता त्या बॅगेत 51 हजार रुपये नोटांचे बंडल आढळले. यावेळी रिक्षाचालक आदम शेख यांनी पैशांची बॅग घेऊन संघटनेचे उपाध्यक्ष फुलचंद लोंढे यांना फोनवरून माहिती दिली.
टाके देवी रिक्षा चालक मालक संघटनेचे स्टँड प्रमुख किरण पवार यांच्या प्रयत्नाने ज्या वक्तीची पैशाची बॅग हरवली होती. त्यांचापर्यंत पोहोचवण्याचे काम किरण पवार यांनी केले.आदम शेख हे प्रामाणिक असल्याने त्यांनी त्याठिकाणी त्यांची इमानदारी दाखवून दिली व ती पैशाची रोख रकमेच्या खात्री करून त्या कौस्तुभ जगताप यांना ती परत केली. कौस्तुभ जगताप यांनी आदम शेख व टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व रिक्षा चालकांना धन्यवाद दिले व त्यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version