रिकी पाँटिंग खोटारडा

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे पर्यंत आहे. त्यामुळे सध्या या महत्त्वाच्या पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. याबाबतच आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. गेल्या काही दिवसात अनेक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची नावे भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने असा दावा केला होता की, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपल्याकडे विचारणा करण्यात आली होती. परंतु, त्याची जीवनशैली सध्या त्यासाठी जुळत नसल्याने हा प्रस्ताव त्याने नाकारल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्याने हा प्रस्ताव बीसीसीआय किंवा जय शाह यांच्याकडून ठेवण्यात आलेला का, याबाबत मात्र स्पष्ट माहिती दिली नव्हती.

आता याबाबत जय शाह यांनी खुलासा केला आहे की, बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला प्रशिक्षकपदासाठी विचारणा केलेली नाही. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांनी सांगितले की ‘मी किंवा बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव दिलेला नाही.

Exit mobile version