रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्स्मधून बाहेर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंग हा दिल्ली कॅपिटल्स् संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नाही. रिकी पाँटिंगचा दिल्ली कॅपिटल्स्सोबतचा करार आता संपला असून यापुढे तो प्रशिक्षकपदावर कार्यरत असणार नाही. रिकी पाँटिंगचा दिल्ली कॅपिटल्ससोबतचा करार संपल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील दुसर्‍या संघात प्रशिक्षक म्हणून सहभागी होण्यास तो उत्सुक आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या पाँटिंगने सांगितले की, दिल्ली फ्रँचायझी एका भारतीयाला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकते. गेल्या महिन्यात पॉन्टिंगच्या सात वर्षांच्या कारकिर्दीनंतर दिल्ली कॅपिटल्स्ने त्याला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. पाँटिंगच्या कार्यकाळात संघाला एकही विजेतेपद जिंकता न आल्याने त्याला या फ्रँचायझीपासून वेगळे व्हावे लागले. मात्र, तो पुन्हा कोणत्याही संघात सहभागी होण्यास तयार आहे.

आयसीसी पॉडकास्टमध्ये पॉन्टिंग म्हणाला, मला पुन्हा आयपीएलमध्ये प्रशिक्षक व्हायला आवडेल. आयपीएलमध्ये सामील झाल्यापासून मी दरवर्षी खूप छान वेळ घालवला आहे. मग ते माझे खेळाडू म्हणून सुरुवातीचे दिवस असो किंवा मुंबईचे प्रशिक्षक म्हणून माझी दोन वर्षे. मी दिल्ली संघासोबत सात हंगाम घालवले आहेत. या काळात दुर्दैवाने मी मला हवे तसे काम केले नाही आणि फ्रँचायझीला हवे तसे समाधान नक्कीच देऊ शकलो नाही.रिकी पॉन्टिंग म्हणाला, मी संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतो आणि तसे झाले नाही. सध्या दिल्ली कॅपिटल्स् अशा खेळाडूच्या शोधात आहे जो हंगामानंतरही फ्रँचायझीला अधिक वेळ देऊ शकेल.

रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स्ने एकदा 2020 मध्ये आयपीएल फायनल खेळली होती. ज्यामध्ये त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पाँटिंग आता कोणत्या संघाचा मुख्य प्रशिक्षकाचा कार्यभार हाती घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version