तरुणांना प्रशिक्षणासह हक्काची नोकरी

आयईएसपी पुढाकारातून उपक्रम

| पाताळगंगा | वार्ताहर |

तरुणवर्ग नोकरी मिळावी यासाठी तो सातत्याने धडपडत असतो. मात्र, हवी तशी नोकरी मिळत नसते. यासाठी आयईएसपी माध्यामातून आजवर मुले विमान वाहतूक, आरोग्यसेवा, आदरातिथ्य, रस्ता सुरक्षा आणि लॉजिस्टिकमध्ये अशा विविध ठिकाणी रुजू झाली आहेत. नुकतीच पाली फाटा-टोल नाका येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या कंपनीचे कार्य सांगण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह अनेक राज्यांतील तरुण या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असून, 3 ते 9 महिने प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना नोकरीला लावत असल्याचे सी.एम.डी. एस.एस. खन्ना यांनी सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रामध्ये रुजू झालेल्या तरुणांना शुभेच्छा देण्यात आल्या. खालापूर येथे बारा एकर या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये विमानचालक, आदरातिथ्य, आरोग्य सेवा, रस्ता सुरक्षा आणि लॉजिस्टिक, नोकरीसाठी व्यवहारिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर के.एम.सी कॉलेज खोपोली येथील पन्नास विद्यार्थ्यांना ही कंपनी प्रशिक्षण देत आहे. दर महिन्याला पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. दहावी ते पदवीधर असलेले तरुण आवडीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट झाले आहेत. यावेळी सी.ई.ओ. ग्रेय खन्ना, के.टी.एस.पी.चेअरमेन संतोष जंगम, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, ग्लोबल मनीष कौल, मारीया मॅथिव आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version