| मुंबई | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण याआधी या दोन देशांच्या अ संघांमध्ये तीन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे, त्यातील पहिला सामना अहमदाबादमध्ये 17 ते 20 जानेवारी दरम्यान खेळला गेला. या मालिकेपूर्वी, बीसीसीआयने केवळ दोन दिवसीय सराव आणि पहिल्या अनधिकृत सामन्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली होती, तर 19 जानेवारी रोजी शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यावेळी रिंकू सिंगची तिसर्या सामन्यासाठी निवड झाली असली तरी आता दुसर्या सामन्यासाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.







