पेणमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पाश्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

पोलिसांकडून दंगल काबू सुरक्षा प्रात्याक्षिक

| पेण | प्रतिनिधी |

पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍वभूमीवर रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने संयुक्त संचलन व दंगल काबू सुरक्षा राबवण्यात आली. लोकसभा निवडणुक व येणाद्यया यात्रा तसेच सणांच्या (गुढीपाडवा, बौध्दपोर्णिमा, रमजान ईद) पाश्‍वभूमीवर पेण पोलीस ठाणे परीसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहाक्कयक पोलीस निरीक्षक गवई, महिला पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, अमोल म्हात्रे अंमलदार, राकेश पवार, आरपीसी टीम यांनी पेण शहरात संयुक्त संचलन व दंगल काबू सुरक्षा प्रात्याक्षिक करुन राबवण्यात आली.

पेण वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुक व येणाद्यया सणांच्या पाश्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संचलन करण्यात आले. या संचनलामध्ये 3 अधिकारी व 27 अमंलदार तसेच दंगल काबू सुरक्षा टीमने सहभाग घेतला होता. पेणमध्ये उपविभागीय पेालीस अधिकारी कार्यालयापसून संचलना सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जा.मा मशीद खान मोहल्ला, महावीर मार्ग खाटीक मोहल्ला, कोळीवाडा नाका, पं.का.पाटील चौक, राजू पोटे मार्ग, कोतवाल चौक, आंबेडकर चौक आणि संचलनाचे विर्सजन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पटांगणात झाले.

Exit mobile version