रितिका शिंदेला बाल पुरस्कार

| सुधागड -पाली | वार्ताहर |

जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी (ता.29) रेशीम बाग नागपूर येथे सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील भार्जे या छोट्या गावातील रितिका नरेश शिंदे हिला राष्ट्रीय नृत्य कलाभूषण बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल तिचे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे. कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर कुणाला आनंदम यांच्या हस्ते रितीकाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारत देशातून आलेल्या असंख्य स्पर्धकांमधून रितिका ची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. रितिका पालीतील ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे.

Exit mobile version