। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
साई मित्र मंडळ गोंडाळे यांच्यावतीने श्री साई बाबा मंदिर अवर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धांचे आयोजन मंगळवारी (दि.22) रोजी गोंडाळे येथे करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेतून ग्रामीण व शहरी भागातील कलाकारांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम हे मंडळ करत आहे. या मंडळाने जिल्ह्यातील कलाकारांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक कलाकार घडले. ही स्पर्धा छोटा गट, मोठा गट व समूह गट या नृत्य प्रकारात संपन्न झाली.
यावेळी मोठ्या गटात प्रथम क्रमांक रतिका नरेश शिंदे (पाली), द्वितीय क्रमांक काव्या जठार (पेण), तृतीय क्रमांक वेदा विजय यादव (पाली) यांनी पटकावला आहे. तर, लहान गटात प्रथम क्रमांक दुर्वा सुशांत झावरे(रेवदंडा), द्वितीय क्रमांक सान्वी कोठावले (पेण) व तृतीय क्रमांक आरोही पाटील (पेण) यांनी पटकावला आहे. तसेच, समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम साई डान्स अकॅडमी (पाली) व द्वितीय क्रमांक हर्षली डान्स अकॅडमी (अलिबाग) यांनी पटकावला असून सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच सर्व सहभागी कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन साई मित्र मंडळाच्यावतीने गौरवण्यात आले.