। मुंबई । प्रतिनिधी ।
सांगली येथे 17 व्या ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे आयोजन 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये मुंबई जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणाल गणवीर आणि रिया सुतार यांनी प्रतिनिधीत्त्व केले होते. यामध्ये रिया सुतार हिने 75 ते 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या प्रतिनिधीचा तिने पराभव केला.







