रिया टायगर्सचा चषकावर कब्जा

देवघर प्रीमियर लीग पर्व-2; नेहारीका इलेव्हनला उपविजेतेपद

। चौल । प्रतिनिधी ।

विघ्नहर्ता मित्रमंडळ, देवघर व संदीपभाई घरत यांच्या संयुक्त विद्यमाने अंडरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिया टायगर्स संघाने विजेतेपद पटकाविले. तर, नेहारिका इलेव्हन संघ उपविजेता ठरला. रविवार, (दि.19) अलिबाग तालुक्यातील देवघर क्रीडांगणावर अंतिम फेरीची लढत शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीची झाली. उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात रिया टायर्गस संघाने चषकावर दिमाखात नाव कोरले.


देवघर प्रीमियर लीगच्या दुसर्‍या पर्वात चौलमळा गावचे सचिन सलूनचे मालक सचिन आमरे यांच्या रिया टायगर्स संघाने नेहारीका संदीप घरत यांच्या इलेव्हन संघाचा अंतिम सामन्यात पराभव करीत चषकावर नाव संपर्णू स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रिया टायगर्सला हे यश संपादन करता आले.

दरम्यान, आयपीएलच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेली ही स्पर्धा गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष तथा अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप घरत यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आली होती. त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण संदीप घरत यांच्या हस्ते करण्यात आले. आयपीएलच्या धर्तीवर पार पडलेल्या या स्पर्धेत संदीप घरत (निहारिका इलेव्हन), सचिन आमरे (रिया टायगर्स), मयूर घरत (रुद्रम सुपरकिंग्स), दीपक घरत (राज वारियर्स), प्रणय घरत (गार्गी स्पोर्ट्स), विकी मळेकर (विकी वॉरियर्स) हे संघ सहभागी झाले होते. स्पर्धा करण्यासाठी विघ्नहर्ता मित्र मंडळ देवघरच्या पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version