कर्जत शहरात रस्ते सफाई मोहीम

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरात गल्लीबोळात सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनले आहेत. पावसाळयात असे रस्ते शेवाळ निर्माण झाल्याने निसरडे बनतात. या निसरड्या रस्त्यावरून कोणी पडू नये आणि अपघात होऊ नये यासाठी कर्जत नगरपरिषदेसह माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी दहिवली विभागात निसरड्या रस्त्यावर पावडर टाकून रस्त्यांची स्वच्छता करण्यात सुरुवात केली आहे.

कर्जत शहरातील बहुसंख्य ठिकाणी रस्त्यावर सिमेंट काँक्रिटपासून रस्ते बनविले आहे. सिमेंटच्या रस्त्यांवर ज्या ठिकाणी रहदारी नसते अशा ठिकाणी ते रस्ते पावसाळयात निसरडे बनतात. त्यामुळे अशा रस्त्यांवर अनेकांना पाय घसरून पडून अपघात झाले आहेत. कर्जत शहरातील दहिवली परिसरात अशी निसरडी परिस्थिती झाली आहे.

त्याबद्दल स्थानिक रहिवाशी यांनी पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांना हि माहिती दिली. त्यानंतर संकेत भासे यांनी त्याबाबत आपल्या कार्यकर्त्यांमार्फत रस्त्यावरील निसरडे भाग सुस्थितीत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरात अनेक भागात रस्त्यावर पावडर टाकून रस्त्याचा निसरडेपणा कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्या कामामुळे रस्त्यावरून पाय घसरून पाडण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

Exit mobile version