। पुणे। प्रतिनिधी ।
पुण्यात मुसळधार पावसाने रायगड-पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट खचला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने 5 ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी सूचना जाहीर केली आहे.
पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी ताम्हिणी घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळे एका बाजूने तडा गेल्याने रस्ता खचला आहे. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. यामुळे अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी आणि नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता 5 ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
ताम्हिणी घाट खचला; ‘या’ कालावधीपर्यंत रस्ता बंद
