| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड शहरातील दत्तमंदिराला लागून श्री क्षेत्रपाल हे भगवान शंकराचे जागृत देवस्थान असून येथे येण्या जाण्यासाठी सुसज्ज रस्ता व रस्त्यावर विजेची व्यवस्था केली जावी, अशी मागणी पद्मदुर्ग व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचे मंदिर हे शंभर वर्ष जुने असून याचा विकास होणे खूप आवश्यक आहे. सदरचे मंदिर मुरुड शहराच्या अगदी जवळ आहे. नगरपरिषदेमार्फत या मंदिराच्या विकासाठी निधी उपलब्ध करून देणे खूप आवश्यक असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता डांबरीकरणं होणे खूपच आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात हा रस्ता संपूर्ण चिखलमय होतो. विशेतः श्रावण महिन्यात येथे जाताना लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच पावसाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने या ठिकाणी काळोख होतो, यासाठी या मंदिराकडे जाणार्या रस्त्याकडे सर्व ठिकाणी वीज व्यवस्था होणे खूपच आवश्यक असल्याचे गायकव यांनी सुचित केले आहे.