अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागणी
| खारेपाट | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील अलिबाग, रामराज, कुरुळ, चौल आदी परिसरात रस्ते खोदाईमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असून, भीषण अपघात घडत आहेत. तरी शासनाने व संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अपघातग्रस्तांना तातडीने मदत करावी, तसेच रस्त्याची कामे शासनाने व ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अलिबाग उद्धव ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख कैलास गजने, शिवसेना रायगड जिल्हा युवा संघटक पिंट्या मधुकर ठाकूर यांनी दिला आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे बाईकस्वार, पर्यटक महत्त्वाचे म्हणजे शाळा कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, उद्योग व्यवसायिक यांना मोठे त्रास सहन करावे लागत आहे. तसेच वाहनांच्या ट्रॅफिकमुळे प्रवाशांना मोठा विलंब होत आहे. तसेच जनतेला विकास हवा आहे. चांगले रस्ते होणे गरजेचे आहे. मात्र, खड्डे मय व नादुरुस्त रस्त्या मुले रस्त्यामुळे भीषण अपघात होत असतील तर तो योग्य नाही. याची दखल जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व यांची दखल संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यावी व जनतेला तातडीने चांगले रस्ते करून द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.







