। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड शहरातील शंकर मंदिर रस्त्यालगतचा खड्डा वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. याकडे नगरपरिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असून, उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
मागील महिन्यात या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व मोर्यांची कामे करण्यात आली. तसेच या ठिकाणी महावितरणची भूमीगत वीजवाहिनी गेली आहे. रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यामुळे रात्री-अपरात्री दुचाकी व तीन चाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मुरुड नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून हा खड्डा बुजविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी वसीम शेखानी यांनी केली आहे.