सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्त्याची दुरुस्ती

| सोगांव | वार्ताहर |

कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावरील सोगांव, मूनवली येथील रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून सोगांव व मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, लाईक कप्तान, साहिल कुर, मुनावर कुर यांनी एकत्र येत स्वखर्चाने रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती सोमवार दि.10 जुलै रोजी करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांची व वाहनचालकांची होणारी गैरसोयीची दखल घेऊन दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, लाईक कप्तान, साहिल कुर, मुनावर कुर आणि त्यांचे सहकारी रोशन अनमाने, मनिष खाडे , साजीद कुर, प्रतिक पाटिल, नितीन हेलम, सोमा वाघमारे, किशोर हेलम, नितीन वाघमारे, गोटू वाघमारे, दिपक, नंदू, प्रणय नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने भरले. त्यामुळे प्रवाशी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या कार्याचे नागरिकांनी तसेच वाहनचालकांना यांचे विशेष कौतुक केले.

Exit mobile version