| तळा | प्रतिनिधी |
तळा येथील जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय येथे गुरुवारी (दि.22) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सूर्यकांत गंभीर यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदाऱ्या तसेच सुरक्षित वाहन चालविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. डॉ. सचिन बंगाळे हे कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करून जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. नसरीन शेख यांनी केली. या कार्यक्रमाला संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉ. नंदकुमारजी वेदक, सचिव उमेशजी वेदक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पुरुषोत्तम मुळे व डॉ. नानासाहेब यादव यांचेही मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.बी. अभंगे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
तळा येथे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
