रस्ता सुरक्षा अभियान कार्यशाळा

| पनवेल | प्रतिनिधी |

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता रस्ता सुरक्षाविषयक कार्यशाळा खारघर येथील भारती विद्यापिठात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे नवी मुंबई सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे विनय मोरे यांनी रस्ता सुरक्षाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना पृथ्वीराज काकडे यांनी केली. या कार्यक्रमाकरीता कोकणचे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, अभिनेता हार्दिक जोशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, प्रा. मोहन अवस्थी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी हरिभाऊ जेजुरकर, निलेश धोटे, विनय मोरे, विवेक खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहन अवस्थी यांनी, सर्व विर्द्यार्थ्यांना महाविद्यलयाच्या परिसरात व रस्त्यावर वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी यांनी त्यांच्या भाषणात खास शैलीत सर्व उपस्थितांचे मागर्दशन केले. तसेच, सिने सृष्टीतील कलाकार शुटींग करतांना व वास्तविक जीवनात वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत असल्याचे नमूद केले. विजय सुर्यवंशी यांनी, सर्व उपस्थितांना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान करावे, चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्टचा वापर करावा व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे करण्याचे आवाहन केले. तसेच, विद्यार्थ्यांना इनरव्हिल या संस्थेच्यावतीने हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

Exit mobile version