इसांबे येथे रस्त्याच्या बाजुला खोदकाम सुरू; अपघाताची भिती

। पाताळगंगा । वार्ताहर ।
सावरोली-खारपाडा हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी वहान चालक यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. मात्र इसांबे या गावनजिक या रस्त्याच्या बाजुला होत असलेल्या खोदकामाविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. कारण या ठिकाणी नागरिक, वाहनचालक, शाळकरी मुले असे हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत. या ठिकाणी मशिनच्या साहाय्याने खोदकाम करीत असल्यामुळे लहान-मोठे दगड उडत असल्यामुळे अपघाची समस्या नाकारता येत नाही.
जिथे रस्ता तेथे खोदकाम होत असते. हे समिकरण काही नविन नाही.एम आयआयडीसी पाताळगंगा येथून पाण्याची लाईन टाकण्याचे काम सध्या सुरु असून इसांबे गावानजदिक खोदकाम सुरु आहे. मात्र या पासून अपघात होण्याची भिती येथिल प्रवासी व्यक्त करीत आहेत.
कोणत्याही कामाला नागरिक अथवा प्रवासी यांचा विरोध नाही. मात्र सुरु असलेल्या खोदकामुळे एखाद्याला अपघात होवून मोठी हानी होता कामा नये. पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे मशिनीद्वारे खोदण्यात येत असल्याने त्याचे दगडाचे बारीक तुकडे, धुळ उडत आहे. त्याच बरोबर या रस्त्यावरून जाताना नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसून इसांबे या मार्गावर हे काम सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे येथून प्रवास करणारे नागरीक नाराजी व्यक्त करीत आहे. यासाठी तातडीने कामाच्या ठिकाणी तातपुरते नेट बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version