रस्त्यालगत वाढलेले गवताची छाटणी

अपघात रोखण्यासाठी उचलले पाऊल
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
सावरोली, रसायनी तसेच धामणी गावानजदिक रस्त्याच्या दुर्तफा झाडे-झुडपे गवत वाढल्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवत असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडल्याचे निदर्शनास आले. गवतामुळे रस्त्यावरील साईट पट्टी खचली आहे हे निदर्शनास येत नाही. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत होते. असे होवू नये यासाठी खालापूर पोलीस, वाहतूक पोलीस अधिकारी, आय.आर.बी चे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून रस्त्यालगत वाढलेले गवत- झाडे- जुडपे कापण्यात आली. रस्त्यावर वाढलेले गवत छाटणी केल्यामुळे रस्त्यावतची साईट पट्टी निदर्शनास येइल त्याच बरोबर अपघाताचे प्रमाण आपण काही प्रमाणात थांबवू शकतो. या दृष्टीकोणातून पोलीस अधिक्षक रायगड अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक पोलीस निरिक्षक अनिल विभुते, त्याच बरोबर वाहतुक युनिट कर्मचारी खालापूर, आय. आर. बी चे कर्मचारी अदि याच्या माध्यमातून ही रस्त्यालगत गवत छाटणी करण्यात आली.

Exit mobile version