डोस देण्याच्या बहाण्याने लुटणारे अटकेत

। मळेघर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील वाशी येथे लहान मुलांना डोस पाजण्याच्या निमित्ताने ग्रामस्थांना लुटणार्‍या टोळीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. वाशीमध्ये चार महिला व पाच पुरुष असा नऊ जणांचा समूह आला होता. आम्ही एका संस्थेचे सभासद असून लहान मुलाना डोस देणार आहोत, डोस आपल्या गावातील डॉक्टर मार्फत देण्यात येतील व त्याची फी प्रत्येकी 30 रूपये रजिस्ट्रेशन इतकी आहे असेल असे सांगून नंतर डोस देताना 250 एवढी रक्कम घेतली जाईल व डोस देण्याचा टायमिंग 3 ते 4 असा असेल सदर डोस देणारी महीला डॉ तुमच्या गावातील आहे त्याना लहान मुळ आसल्याने दुपारी घरी जाते आसे सांगत ही मंडळी गावात फिरत होती व नाव नोंदणी करत होती.

ही बाब वाशी संरपच गोरख पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत डॉक्टरांकडे चौकशी केली.पण त्यांनीही अशी कोणतीच मोहीम नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी डोस देणार्‍याव्यक्तींना ग्राम पंचायत कार्यालयात बोलवून चौकशी केली असता त्याच्या कडे कोणत्याही प्रकारचा ओळखपत्र नव्हते तसेच आरोग्य कार्यालयाकडील पत्रही नव्हते, तसेच त्यांच्या वरिष्ठाना बोलवले आसता ते पण येण्यास टाळाटाळ करु लागले. सर्व गोष्टची शहानिशा करून संरपच यांनी वडखळ पोलीस स्टेशन ला ही बाब सांगितली . वाशी येथे पोलिसानी सर्व प्रकारची चौकशी केली केली असता ही माणसे बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

Exit mobile version