द्रोणागिरी स्टेशन परिसरात लुटमारीचे सत्र सुरू

महिला प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी

| उरण । वार्ताहर ।

बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनमधून अनेक प्रवासी नागरी, नोकरदार, विद्यार्थी तसेच काही कामानिमित्त नवीमुंबई शहराकडे जाणार्‍या महिला या प्रवास करत आहेत. द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात, रस्त्यावर वाढलेल्या गवताचा फायदा उठवत भामटे स्टेशनवरून आपल्या घराकडे जाणार्‍या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा करत आहेत. तरी प्रवाशी नागरीकांनी विशेष करून महिलांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

मुंबई व नवी मुंबई शहराला जोडणारी उरण रेल्वे सेवा ही 2024 मध्ये सुरू झाल्याने त्याचा फायदा हा उरणच्या जनतेला, नोकरदार, विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरीकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य पसरले असल्याने त्यांचा त्रास हा प्रवाशी नागरीकांना सहन करावा लागत आहे.

द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात, रस्त्यावर वाढलेल्या गवताचा फायदा उठवत भामटे स्टेशनवरून आपल्या घराकडे जाणार्‍या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा करत असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे. तरी रेल्वे व सिडको प्रशासनाने खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात, रस्त्यावर वाढलेले गवत काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.तसेच रेल्वे पोलीस तैनात करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version