| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाड तालुका रिक्षा युनियनला सुमारे चाळीस वर्षांचा इतिहास असून, आजही युनियन त्याकाळात होती, तितकीच मजबूत आहे. युनियनमध्ये अनेकांनी फूट पाडण्याचे असफल प्रयत्न केलेले आहेत. मात्र, आपल्या रिक्षा युनियनची एकजूट अभेद्य होती, आहे आणि कायम राहणार, असे प्रतिपादन महाड तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष रोहित रवींद्र पाटील यांनी केले.
महाड तालुका रिक्षा युनियनची वार्षिक सर्वाधारण सभा नुकतीच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रामाणिक रिक्षा चालकांचा गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला. रिक्षातून प्रवास करताना अनेकवेळा प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू विसरून जातात. अशावेळी युनियनमधील रिक्षाचालक सदरच्या वस्तू इमाने इतबारे परत करतात.
या सभेत जमा खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला. तसेच विविध विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यात आले. यावेळी युनियनच्या तालुका सचिव पदी श्री. शेखर सावंत यांची एकमताने निवड झाली. तसेच राजेश रांजणकर व संदीप सकपाळ यांची अनुक्रमे राम मंदिर व चवदार तळे रिक्षा स्टॉप्सच्या स्टॉप अध्यक्षपदी निवड झाली.या सभेला युनियनची तालुका कार्यकारिणी, सर्व स्टॉप अध्यक्षांसह दोनशेच्यावर सभासद उपस्थित होते. महाड तालुका रिक्षा युनियनमध्ये यापुढे जास्तीत जास्त सभासद होण्याचे आवाहन आणि आभारप्रदर्शन मावळते सचिव सुधाकर पालांडे यांनी केल.