रोहित शर्मा भाकरी फिरवण्याच्या तयारीत?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघ आता पुढील एकदिवसीय मालिका फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी केवळ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यामुळ रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी रोहित शर्मा भारतीय संघात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मासोबत एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात सध्या शुभमन गिल करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिल सलामीवीर म्हणून अपयशी ठरला आहे. चॅम्पियन्स ट्राफीपूर्वी भारतीय संघ केवळ तीन सामने खेळणार आहे. यामुळे आगामी काळात सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालला देखील संधी दिली जाऊ शकते. यशस्वी जयस्वाल 2024 मधील आक्रमक आणि यशस्वी क्रिकेटपटू आहे.

भारताच्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून आगामी काळात रोहित शर्मा वॉशिंग्टन सुंदर आणि रियान परागला अधिक संधी देऊ शकतो. हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा प्रश्न असल्याने नुकतीच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. पुढील काळात भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि शिवम दुबे यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात येऊ शकतो. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यांना अधिक संधी दिली जाऊ शकते.

Exit mobile version